Pimpri : पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट येथे पार्थ पवार यांची प्रचारात आघाडी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेत आता परिवर्तन होणार, राष्ट्रवादीचाच खासदार होणार, असा पार्थ पवार यांच्या विजयाचा निर्धार राष्ट्रवादीच्या शिलेदारांकडून पिंपरीत करण्यात आला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी मार्केट, पिंपरी कॅम्प भागामध्ये नागरिक, व्यापा-यांच्या भेटीगाठी घेऊन जोरदार प्रचार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका उषा वाघेरे, नगरसेविका निकिता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माधुरी मुलचंदानी, हरीष आसवानी, माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक गुरुबक्ष पहलानी, रामआधार धारिया, अर्जुन कदम, श्रीरंग शिंदे, हनुमंत नेवाळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.