Pimpri : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून निषेध

एमपीसी न्यूज – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक विलास मडिगिरी, उमा खापरे, बाबासाहेब त्रिभुवन, आशा शेंडगे, अमोल थोरात, विजय शिंदे, दीपक नागरगोजे, शशिकांत कदम, शांताराम भालेकर, राजू दुर्गे, महेश कुलकर्णी, सुरेश भोईर, नेहूल कुदळे, नामदेव ढाके, सुजाता पालांडे, शोभा भराडे, संजीवनी पांडे, दीपाली दानोकर आदी उपस्थित होते.

  • पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि. 14) पुलवामा जिल्ह्यात भीषण आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. सुट्टी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या 2 हजार 547 जवानांना 70 वाहनांतून नेले जात होते. प्रत्येक वेळी एक हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे. भारत सरकार आणि भारतीय सैन्य याचा योग्य प्रकारे बदला घेईलच. 350 किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक सैन्याच्या वाहनाला धडकला, या घटनेमागे पाकिस्तान, दहशतवादी संघटना तर आहेतच त्याचबरोबर यासाठी काही घरभेदी देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या घरभेद्यांना धडा शिकवणं, सर्वात पहिलं आव्हान भारतासमोर आहे. शहिदांच्या कुटुंबियांना भावनिक, सामाजिक, आर्थिक अशी सर्व प्रकारची मदत करणं ही भारतीयांची प्रथम जबाबदारी आहे, असेही निषेध सभेत सांगण्यात आले. तसेच सर्व भारतीयांनी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.