Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरातील धनगर समाज बांधवांचा श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील धनगर समाजाच्या काही मोजक्या तुरळक समाज बांधवांनी धनगर समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा केवळ श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव -पाटील यांनाच आहे, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ज्या ठराविक कार्यकर्त्यांनी दिला त्या कार्यकर्त्यांचा तो वैयक्तिक पाठिंबा आहे. हे तुरळक कार्यकर्ते म्हणजे पिंपरी- चिंचवड शहरातील संपुर्ण धनगर समाज नव्हे. प्रत्यक्षात शहरातील धनगर समाजाचे बहुतांश मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याच्या मानसिकतेत अजिबात नाहीत. आम्ही शहरातील तमाम धनगर समाज बांधव मिळून मावळ लोकशाभेसाठी शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना त्याचबरोबर शिरुर मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील या दोन्ही उमेदवारांना पिंपरी चिंचवड शहरातील तमाम धनगर बांधवांच्या वतीने पाठिंबा जाहीर करीत आहोत.

  • आम्ही सर्व पिंपरी-चिंचवड शहरातील धनगर समाज बांधव (राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे तुरळक वगळता) शिवसेना-भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच मतदान करणार आहोत.

राजू दुर्गे, अशोक खरात, विना सोनवलकर, महादेव कवीतके, मिना ढोले, बाळासाहेब वाघमोडे, भरत महानवर, भाऊसाहेब हरणावळ, विश्वास मोटे, बजरंग गडदे, महावीर काळे, बंडू मारकड, सुर्यकांत गोफने, विजय वाघमोडे, जितेंद्र मदने, राजेंद्र घोडके, अजित चौगुले, आशा काळे, मंगल बुधनेर, विनय खामगळ, पोपट हजारे, संजय नायकवडी, गणेश खरात, नामदेव सोनवलकर, नागेश तितर, माणिकराव बारगळ, शिवाजी बिटके, गजानन वाघमोडे, सदाशिव पडळकर, कैलास कोपनर, गिरीष चिकटे,कुंडलिक हुलवान, दत्ता शेंडगे, बबनराव मदने, तानाजी पाडोळे, शिवाजी काळे, नितीन कोपनर, रवी लिटे, आनंदराव तांबवे, सुनिल नवले, दत्तात्रय काळे, दत्तानंद सोनवलकर, अनिल चौगुले, सतीश मदने, प्रवीण शिंदे, शिवाजी आवारे, प्रफुल कोळेकर, युवराज माने, बंडू लोखंडे, आर आर बारगळ, बाबासाहेब पाटील, अजय सुळ, संजय हाटकर, राहुल मदने, आबा सोन्नवर, आनंद धनगर, सुरेखा जानकर, गोरख खामगळ, नंदा करे, डॉ अण्णा लबडे, किशोर शिंदे, शारदा वाघमोडे, सोनताई गडदे, प्रकाश मोटे, चेतन तळपे, विलास महारनवर, बाळु शेंडगे, दादासाहेब मासाळ, राजू धायगुडे, कल्याण बर्वे, जयराम शिंदे, अजय सुळ, उमेश थोरात, पांडुरंग माने, बबनशेठ खरात, भरतशेठ कोकरे, हनुमंत मोटे, आदी सर्व प्रमुख कार्यकर्ते यात सहभागी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.