Pimpri : पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहरूनगर (Pimpri) येथील कोर्टात उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. नितीन कांबळे, ॲड‌. सागर अडागळे, ॲड. वाळके, ॲड. प्रविण जगताप, ॲड. मिलिंद कांबळे, ॲड. श्रीराम गालफाडे, सदस्य ॲड. जयेश वाघचौरे, ॲड. सुर्यकांत शिंदे, ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. एश्वर्या शिरसाठ आदी वकील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एन. गायकवाड, निवृत्त न्यायाधीश बी. एन. वाघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.सुनिल कडुसकर, माजी अध्यक्ष ॲड. नाना रसाळ, अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, महिला सचिव ॲड. वर्षा तिडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ ॲड. बी. के. कांबळे, ॲड. अरुण खरात, ॲड. पी. एस. कांबळे, ॲड. संभाजी बवळे, ॲड. संभाजी वाघमारे, ॲड. सुनील माने, ॲड‌. नारायण थोरात, ॲड. राज जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर व्याख्यान देऊन विनम्र अभिवादन केले.

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे समाज परिवर्तनाचे विचार; डॉ. दत्तात्रय गायकवाड यांचे प्रतिपादन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सदस्य ॲड. विशाल पौळ यांनी केले. ॲड. तेजस चवरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.