Pimpri : पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन पिंपरी आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवारी) पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी या गावात श्रमदान करण्यात आले. अंदाजे एका पावसाळ्यातील १३ लक्ष ५० हजार लिटर वाहून जाणारे पाणी वाचवून भूगर्भात सामावले जाईल इतके काम पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन मार्फत एका दिवसात झाले.

यावेळी अध्यक्ष सुनील कडूसकर, सचिव गोरख कुंभार, सहसचिव अ‍ॅड. अंकुश गोयल, हिशोब तपासनीस महेश टेमगिरे, सदस्य रामचंद्र बोराटे, पूनम राऊत, माजी खजिनदार हर्षद नढे, अविनाश टेमगिरे, रामकिशन सेहगल, आदींनी सहभाग घेतला. याप्रसंगी पाणी अडवा – पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भात जिरवण्यासाठी डोंगर उतारावर चर खोदण्यात आले.

  • अध्यक्ष सुनील कडूसकर म्हणाले, “आपण समाजाचे ऋणी आहोत. ते ऋण फेडण्यासाठी व महाराष्ट्रातील दुष्काळाची तीव्रता पाहून प्रत्येकाने पाणी व पर्यावर्णाचे संरक्षण करायला हवे. ही आपली नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. तरच मनुष्य या पृथ्वीवर जगू शकेल अन्यथा नामशेष होईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.