Pimpri : पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार

एमपीसी न्यूज- जनसेवा सहकारी बॅंक लि.  एमआयडीसी भोसरी शाखेचा 18 व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अडव्होकेट बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. दिनकर बारणे पाटील आणि यांचा नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार बॅंकेचे माजी अध्यक्ष व संचालक अॅड. सतीश गोरडे, राष्ट्रीय स्वयंसेवक महाराष्ट्र प्रांत धर्मजनक प्रमुख हेमंत हरहरे यांच्या हस्ते कऱण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी अॅड.अतुल अडसरे, उपाध्यक्ष अॅड.हर्षल नढे, सचिव अॅड.सुजाता बिडकर, (ऑडिटर) अॅड.सुजाता कुलकर्णी, सहसचिव पूनम राऊत, खजिनदार – अॅड.सागर अडागळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उदयोजिका सुनिता पाटसकर, अॅड.रुपाली वाघेरे, अॅड.रोहिणी जगताप, अॅड. सुनील कडुसकर आदी उपस्थित होते.

शाखा व्यवस्थापक विलास लांडगे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अॅड. सतीश गोरडे यांनी केले. आभार विनायक जोशी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.