Pimpri : पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने तीन राज्यातील निवडणुकींचा विजयोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड (Pimpri)या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जनतेने सत्तेचा कौल दिला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या वतीने मोरवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप, सुजाता पालांडे, तुषार हिंगे, शारदा सोनवणे, मोरेश्वर शेंडगे, सागर अंगोळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ती राज्यातील विजयाच्या पार्श्वभूमीवर (Pimpri)भाजपा पिंपरीच्या कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी एकमेकांना पेडे भरविले. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना पेडे देऊन विजयोत्सव साजरा करण्यात आला.

 

Nigdi : बस प्रवासात दोन लाख 35 हजारांचे दागिने चोरीला

 

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी हलगीवर ठेका धरला तर महिलांनी फुगडी घातली. भारत माता की जय, जय श्रीराम, भाजपाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

भारतीय जनता पक्षाला मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वास आणि विकास या धोरणामुळे मिळाले आहे. येत्या काळात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वास शहरअध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.