Pimpri : ढोल-ताशांच्या गजरात औद्योगिकनगरीत बाप्पाचे स्वागत

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…..अशा घोषणा देत आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाच स्वागत केले जात आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज (सोमवारी) घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून औद्योगिक नगरीत उत्साहाला उधाण आले आहे.

गणेशोत्सावाला आजपासून सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बाप्पाच्या आगमाने वातावरण भक्तीमय वातावरणात झाले आहे. शहरात उत्साहाला उधाण आले आहे. घरोघरी बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. शहरातील चौक गर्दीने फुलून गेले आहेत. बाप्पाला घेऊन जाण्यासाठी पहाटेपासून स्टॉलवर गर्दी होत आहे. बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत.

शहरातील मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे आगमन दुपारनंतर होणार असल्यामुळे मंडळांचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.