Pimpri : चिंचवड देवस्थान ट्रस्टने भारतीय संस्कृतीचे रक्षण केले – श्री शांतीनाथ महाराज

'श्री मोरया जीवन गौरव' पुरस्काराने श्री शांतीनाथ महाराज यांचा गौरव

एमपीसी न्यूज – ब्रह्मांड हेच माझे घर असे मानणारा नाथ संप्रदाय आहे. या संप्रदायात कोणताही भेद नाही. चिंचवड देवस्थानचे काम उत्तम आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. भारतीय संस्कृतीला पुढे घेऊन जाणाऱ्यांचा देवस्थान सत्कार करत आहे. भारतीय संस्कृतीचे देवस्थानने रक्षण केले  आहे, अशी भावना श्री शांतीनाथ महाराज यांनी व्यक्त केली. मोरया गोसावींच्या भूमीत त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला, हे माझं भाग्य आहे, असेही ते म्हणाले.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 458 वा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात  सिद्ध सद््गुरु योगी श्री शांतीनाथ महाराज यांचा ‘श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव देऊळमळा पटांगणावर सुरु आहे.  चिंचवड देवस्थानतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येतो.  खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘श्री मोरया पुरस्कारा’ने आज (सोमवारी) सन्मानीत करण्यात आले. तसेच गोरख भालेकर, अॅड. गजानन हेरंब, वेदमूर्ती यशवंत पैठणे, सुमेधा चिथडे, ह.भ.प रेश्मा काकडे, ज्योत्स्ना एकबोटे, मच्छिंद्र तारु, सुनील मुथा, श्रीदत्त राऊत, डॉ. बी.पी.रोंगे, भूषण तोष्णिवाल, दिलीप तावरे यांना ‘श्री मोरया पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात आले.

यावेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्वस्त विश्राम देव, विनोद पवार, राजेंद्र उमाप, आनंद तांबे, माजी विश्वस्त महादेव काकडे, नवनाथ काकडे, योगेश चिंचवडे,  गजानन चिंचवडे, गुरुबाबा महारास औसेकर, सतीश उरसळ, अशोक संकपाळ, मिलिंद एकबोटे, अॅड. नरेंद्र देव, नंदकुमार एकबोटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.