Pimpri : पिंपरी चिंचवड फिल्म क्लबतर्फे मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट ( PCISFF ) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 16 आणि 17 मार्च 2019 रोजी हा लघुचित्रपट महोत्सव होणार आहे.

आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील चित्रपटप्रेमींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्या निमित्ताने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व चित्रपटप्रेमींना आंतरराष्टीय दर्जाचे लघुचित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या महोत्सवादरम्यान चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणार असून चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

अधिक माहिती महोत्सवाची वेबसाईट http://www.pimprichinchwadisff.com वर उपलध आहे. अशी माहिती महोत्सवाचे आयोजक आणि पिंपरी चिंचवड फिल्म क्लबचे संचालक अविनाश कांबीकर आणि दत्त गुंड यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.