Pimpri : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव लांबणीवर

एमपीसी न्यूज – सध्या भेडसावत असलेल्या जागतिक संसर्ग कोरोना (कोविड -19) च्या पार्श्वभूमीवर शहरात 10 एप्रिल रोजी होणारा पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव स्थगित करून काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. महोत्सवाच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. पीसीएमसी फिल्म क्लबच्या सोमवारी (दि.16) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फेस्टिवलचे संचालक रमेश होलबोले यांनी दिली.

 

यावर्षी महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरतराष्ट्रीय मिळून 400 लघु चित्रपट सहभागी झाले असून या महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षक उपस्थित राहणार होते परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य आणीबाणीमुळे आंतरराष्ट्रीय परीक्षक या महोत्सवास उपस्थित राहू शकत नाहीत. भारताच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून सिनेदिग्दर्शकांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे, मात्र त्यांना सहभागी होणे शक्य नाही.

 

शासनाने काढलेल्या परीपत्रकानुसार व जगात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून सर्व सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्यामुळे लघु चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. या वर्षीच्या महोत्सवात पिंपरी चिंचवडवासीयांना “पिंपरी चिंचवड शोकेस” अंतर्गत स्थानिक कलाकारांचे उत्कृष्ट लघु चित्रपट पहावयास मिळणार आहेत.

 

या बैठकीला फेस्टिव्हलचे डायरेक्टर रमेश होलबोले, पीसीएमसी फिल्म क्लबचे संचालक अविनाश कांबीकर व दत्ता गुंड, फेस्टिव्हलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर हर्षवर्धन धुतुरे, फेस्टिव्हलचे प्रमुख मार्गदर्शक पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.