Pimpri : पिंपरी-चिंचवड मातंग एकता आंदोलन संघटनेची कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड मातंग एकता आंदोलन संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दत्तू चव्हाण तर महिला अध्यक्षपदी आशा शहाणे यांची तर मातंग एकता आंदोलन युवक आघाडीच्या अध्यक्षपदी विशाल कसबे यांची निवड करण्यात आली.

पिंपरीत मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचा शहरातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करुन शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच शहर कार्याध्यक्ष पदी मोहन वाघमारे, सचिवपदी सतीश भवाळ, तर सरचिटणीसपदी दशरथ सकट यांची निवड करण्यात आली.

  • कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू काश्मिरी येथील पुलवामा शहिद जवानांना आणि समाजातील ज्येष्ठ नेते दशरथ कसबे आणि सिताराम खुडे यांनी श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते संदिपान झोंबाडे, किशोर धगाटे, भगवान शिंदे, नाना कसबे, हिरामण खवळे, संदिप जाधव, जग्गनाथ आल्हाट, राजू आवळे, बाळासाहेब खंदारे, विठ्ठल कळसे, दत्ता थोरात, कैलास पाठोळे, शेषेराव कसबे, राजू धुरंधरे, सुनिल भिसे, बाळासाहेब पाठोळे, श्रावण बगाडे, बापुसाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.

याबाबत अविनाश बागवे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात नव्याने कार्यकारणी निवडीनंतर अधिक जोमाने शहरातील समाजाचे प्रश्न अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी कटिबद्ध राहतील शहरात आणि राज्यात समाजात होत असलेले अन्याय तसेच अत्याचार यांना शासन दरबारी रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देत आहेत.

  • राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहारातील समाजाचे कार्यकर्ते नितिन घोलप यांना ” साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार ” आणि एम. एस. गायकवाड यांना भारत सरकार नोटरी परवाना मिळाल्या बद्दल दोघांचे विषेश सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात अशोक कांबळे, विठ्ठल थोरात, मनोज तोरडमल, संजय साठे, संजय धुतडमल यांनी मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल कळसे यांनी तर प्रास्तविक दत्तू चव्हाण यांनी आणि आभार कैलास पाठोळे यांनी मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.