Pimpri : महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले थोर महामानव होते. त्यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तसेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण दिली. समाजातील वंचित घटकांच्या न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने तसेच सत्याग्रह केले. त्यांच्या तेजस्वी व व्यापक विचारांनी समाजातील विविध घटकांना नेहमीच योग्य दिशा दाखविण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप (Pimpri) यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, भीमसृष्टी पिंपरी येथील तसेच एच. ए क़ॉलनी (Pimpri) येथील पुतळ्यास आणि दापोडी येथील महापालिका शाळेजवळील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

Pune : संविधान’ हीच स्वतंत्र भारताची ओळख असून, ‘संविधान आधारीत देशाची वाटचाल’ हीच बाबासाहेबांना आदरांजली – गोपाळ तिवारी

या कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे (Pimpri), सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, तानाजी नरळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा अनेक क्षेत्रांमधील ज्ञान अवगत होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदव्या मिळविल्या होत्या. ते उत्तम लेखक, अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले असून त्यांची जयंती देशातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात साजरी करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.