Pimpri : पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसतर्फे उन्नाव येथील घटनेचा निषेध

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने उत्तरप्रदेश मधील उन्नावच्या पिडीत युवतीवर झालेल्या अन्यायकारक घटनांचा निषेध करण्यात आला तसेच भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर व अन्य आरोपींवर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात झालेल्या निषेध सभेला प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव व पिंपरी चिचंवड युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रिया पवार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, अल्पसंख्यांक विभागाचे सचिव राजन नायर, प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, एन एस यू आय चे माजी अध्यक्ष सचिन कोंढरे, अशोक काळभोर, उमेश बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस गौरव चौधरी, सिध्दार्थ वानखेडे, नियाज शेख,फारूख खान, विशाल कसबे आदि पदाधिकारी व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र बनसोडे म्हणाले, ” उत्तरप्रदेश मधील उन्नाव येथील बलात्कार व खून प्रकरण अमानवीय व विकृत मनोवृत्तीचे लक्षण असून जनतेनध्ये चीड व संतापाचे वातावरण आहे, अत्याचारासाठी सत्तेचा गैरवापर हे भाजपा राजवटीचे सूत्र आहे. या बाबत भाजपा वरिष्ठ नेत्यांनी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन हे भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर याच्या या कृत्याला मूक संमती दिल्याचेच प्रतीक आहे. यातून भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. आता सहनशीलतेचा अंत झाल्याने जनता भाजपाला घरचा रस्ता दाखविल्या शिवाय राहणार नाही” असे बनसोडे म्हणाले.

यावेळी सचिन कोंढरे,अशोक काळभोर, प्रिया पवार, अशोक मोरे यांनी भाजप सरकारचा निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.