_MPC_DIR_MPU_III

Pimpri :पिंपरी-चिंचवडकरांना ‘अभिव्यक्ती’ नृत्याची 5 ऑक्टोबर रोजी मेजवानी; 100 पेक्षा जास्त विद्यार्थिनींचा कार्यक्रमामध्ये सहभाग

नृत्यांगना पायल गोखले करणार प्रस्तूत

एमपीसी न्यूज – रंगयात्रा आणि पायल नृत्यालय प्रस्तुत ‘अभिव्यक्ती’ हा कथक नृत्याचा कार्यक्रम 5 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध कथक नृत्यांगना पायल गोखले स्वतः कथक नृत्यप्रस्तूती करणार आहेत. त्याचबरोबर पायल नृत्यालयाच्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थिनीं या कार्यक्रमामध्ये नृत्य सादरीकरण करणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कलाप्रेमी रसिकांना नृत्याची मेजवानी मिळणार आहे. याबाबतची माहिती पायल गोखले यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायक पं. सुधाकर चव्हाण, नाना दामले, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्रसिद्ध कथक नर्तक पं. नंदकिशोर कपोते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध कथक नृत्यांगना पायल गोखले स्वतः कथक नृत्यप्रस्तूती करणार आहेत. त्याचबरोबर पायल नृत्यालयाच्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये नृत्य सादरीकरण करणार आहेत. यामध्ये शिव धृपद, पंचम सवारी ताल, सरगम,चतरंग, सावन, पदन्यास, पोवाडा, लोकनृत्य, हनुमान स्तुती इत्यादी रचना सादर होणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कार्यक्रमाच्या शेवटी पायल गोखले भगवान शंकरने केलेले 7 प्रकारचे तांडव नृत्य “शिवतांडव” या नृत्य संरचनेतून सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी तबल्यावर विवेक भालेराव, संवदिनीवर लीलधर चक्रदेव, गायन अर्पिता वैशंपायन, बासरीवर आदित्य गोगटे तर पढंत मानसी भागवत आणि पायल गोखले करणार आहेत.

अधिक माहितीसाठी पायल गोखले यांच्याशी 9860206220 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.