Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले पिंपरी-चिंचवडकर

एमपीसी न्यूज – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसामुळे पुरस्थितीने थैमान घातले. या पूरस्थितीमुळे संसारापासून वंचित झालेल्या नागरिकांसाठी नेहरुनगरमधील नागरिक धावून आले आहे. या प्रभागातील नगरसेवक राहुल भोसले यांच्या पुढाकाराने येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तासाठी मोठी मदत जमा केली आहे. अशा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवडकर सरसावले आहेत.

यात अन्नधान्य, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या, कपडे, साड्या, आंघोळी व कपडे धुण्यासाठी लागणारे साबण,पावडर,स्वच्छतेसाठी फिनेल,झाडु,चादरी, ब्लँकेट, सतरंजी, चटाई, लहान मुलांनचे कपडे, औषधे अशा प्रकारची मदत मोठ्या प्रमाणावर जमा केली आहे. ही मदत राहुल भोसले युवा मंचाचे कार्यकर्ते स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन तेथील नागरिकांना वाटप करणार आहे. ही मदत मिळवण्यासाठी सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून मदत जमा होण्यासाठी मदत झाल्याचे नगरसेवक राहुल भोसले यांनी सांगितले.

  • नेहरूनगरमधील नागरिकांचा हा मदतीचा आदर्श इतर भागातील नागरिकांनी घेतल्यास पूरग्रस्त नागरिकांचे संसार उभा राहण्यास मदत होईल. यामध्ये तवकल्ला मज्जिद मुस्लिम बांधव नेहरूनगर, पिंपरी यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी ट्रॅक पॅन्ट 100 नग, लेडीज टॉप 50 नग, लहान मुलींचे टॉप 25 नग, टी – शर्ट बिग साईज 125 नग, साडी 102 एवढ्या कपड्यांची मदत झाली.

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड तसेच शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या माध्यमातून मदतीचा हात यावेळी संजोग वाघेरे पाटील,विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे,नगरसेवक राजू मिसाळ, प्रशांत शितोळे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, विजय लोखंडे सुनिल गव्हाणे तसेच पिंपरी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कुटी घेवून ट्रक पाठवण्यात आला.

  • कोल्हापूर – सांगलीत पुराचा थैमान, आदित्य कुलकर्णी व मित्र परिवार तर्फे पिंपरी चिंचवड शहरातून 750 किलो पेक्षा अधिक मदत रा स्व संघ जनकल्याण समिती केंद्र सावरकर मंडळ येथे जमा झाले.

रविवारचे औचित्य साधून आदित्य कुलकर्णी ह्यांनी शहरात १२ संकलन केंद्र नेमून दिले होते. शहरातील प्रत्येक भागात केंद्र होते, पिंपरी वल्लभनगर, अजमेरा, राहाटणी, चिंचवड गाव, प्रेमलोक पार्क, यमुनानगर निगडी, चिखली गावठाण, घरकुल चिखली, संभाजीनगर शाहूनगर हिंजेवाडी मारुंजी -माण, भोसरी एमआयडीसी आकुर्डी दत्तवाडी व तसेच अगदी हिंजेवाडी – माण – मारुंजी, प्रत्येक भागात एक संकलन केंद्र होते.

  • शहरातील प्रत्येक भागात सोशल मीडियावर आव्हान केले असून, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातून साधारण 750 kg च्या वर मदत गोळा झाली. कपडे, अन्नधान्य, औषध, दैनंदिन वापरातील वस्तू, अशा अनेक गोष्टी गोळा करून देण्यात आल्या.

ह्यात सोबत सहकारी सामील – सुषमा वैद्य, प्रशांत कुलकर्णी, सोहन वैशंपायम, तपन इनामदार, सूरज देशमाने, मुकुंद कुलकर्णी, तेजस वाघोले, श्रीनिवास कुलकर्णी,सुधीरकुमार अगरवाल, विजय जोशी, उज्वला केळकर, प्रसाद पाटील, शिरीष कुलकर्णी व नगरसेवक प्रा उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप व उद्योजक बापू घोलप आदी उपस्थित होते.

  • ‘एक हात मदतीचा.. एक हात कर्तव्याचा’ या भावनेने सांगली कोल्हापूर या भागातील पूरग्रस्तांसाठी कर्तव्याचे भान ठेवून सौ.सुलभाताई रामभाऊ उबाळे यांच्या मार्गदर्शना खाली व सौजन्याने 2000 साड्या, 500 ब्लँकेट, शर्ट पँट 1000 लोकांसाठी सर्वं जीवनावश्यक वस्तूंचा संच 15 दिवस जाईल इतका तसेच रोख स्वरूपात 11 हजार 111 रुपये तसेच या वेळी एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सुलभा रामभाऊ उबाळे जिल्हा संघटिका, कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेविका शुभांगी बोर्हडे, शशीकला उभे, भारती चकवे, जनाबाई गोरे तसेच मार्गदर्शक रामभाऊ उबाळे, संजय बोर्हडे, नितीन बोंडे, सतीश मरळ, गणेश इंगवले, नारायण कोर्वी, मारुती उभे, युवानेते अजिंक्य उबाळे, युवासेनेचे अमित शिंदे, कौस्तुभ गोळे तसेच यमुनानगर परिसरामधील नागरिक उपस्थित होते

  • कोल्हापुर व सांगली येथील पुरग्रस्त नागरिकांसाठी पिंपरी युवासेनेतर्फे 500 कुटुंबियांना पुरेल इतक्या वस्तू व अन्नधान्य देण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकी कुटुंबाला गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, मीठ,चहापत्ती, कोलगेट, खोबरेल तेल,साबण, तूरडाळ, मसाला, समाविष्ट करण्यात आले आहे. सुमारे दीड टन धान्य व वस्तू पाठविण्यात आल्या. यावेळी युवतीसेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, विभाग संघटिका कामिनी मिश्रा, विद्या प्रसाद देसाई, सनी कड, ओंकार जगदाळे, अमित शिंदे, अजय पिले, अजित बोराडे, रवी नगकर, विकास गायकवाड, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

पिंपळे सौदागर सोसायटीमधील रहिवाशी, ग्रामस्थ यांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
सामाजिक भान ठेऊन आज प्लाम ब्रीझ, साई ड्रीमस, लक्षदीप पॅलेस, राजवीर पॅलेस, रोस आयकॉन, अल्कोव सोसायटी, दीपमाला सोसायटी, वसंत अव्हेनु, शिवम सोसायटी, यशदा सिद्धी, रोस वूड सोसायटी, जर्वरी सोसायटी, कुणाल आयकॉन, गणेशाम, या सोसायटी मधून वस्तुरूपामध्ये गहू, तांदूळ, कपडे, पाणी, खाद्यपदार्थ इत्यादी मदत तात्या बालवडकर अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विभाग “स्वाभिमानी शेतकरी संघटना” यांचा कडे सुपूर्त केली.

  • याप्रसंगी कुंदाताई भिसे यांनी आश्वासन दिले की, धनादेश (चेक) आणि रोख रक्कम तसेच वस्तुरूपामध्ये दिलेली मदत मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्त केली जाईल.

प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवक पूरग्रस्तांसाठी सरसावले
कोल्हापूर सांगली व सातारा येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक समीर मासुळकर व नगरसेवक राहुल भोसले हे दोघेही आपल्या कार्यकर्त्यांसह कोल्हापूरला याठिकाणी त्यांच्या मदतीसाठी रवाना झाले आहेत.

  • कोल्हापूर सांगली सातारा येथील नागरिकांसाठी त्यांनी जीवन जीवनावश्यक वस्तू त्याठिकाणी बरोबर घेतल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अन्नधान्य, औषधे, कपडे नॅपकिन, साबण, टूथपेस्ट, फिनेल, बिस्किटे, किराणामालचे साहित्य, पाण्याच्या बाटल्या, ब्लांकेट्स आदी वस्तू दोन ट्रकमध्ये भरून ते आपल्या बरोबर घेऊन गेले आहेत.

वरील वस्तूंसाठी मासुळकर कॉलनी तसेच नेहरूनगरमधील नागरिकांनी भरभरून मदत केली आहे. एकता मित्र मंडळ व लोकमान्य मित्र मंडळाच्या गुरुदत्त मित्र मंडळ नेहरूनगर सिद्धार्थ संघ मासुळकर कॉलनी कार्यकर्त्यांनी त्यासाठी झटले आहेत. उपस्थितांमध्ये प्रामुख्याने अमोल मोघे, सचिन पालेकर, विशाल गाडेकर, सूरज पैलवान, मोहसीन खान, विवेक विधाते, बाबू रॉय, अनिल यादव, महेश कोळपकर, संजय घाडगे, संतोष लष्करे, रामा नलवडे, रिषभ पनिकर, संजय कदम आदी उपस्थित होते.

  • पिंपरी चिंचवड आणि नांदेड सीटीमधून देखील येथील पूरग्रस्तांसाठी मदत रवाना
    राज्यभरातून कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांना मदत रवाना होत असताना पिंपरी चिंचवड व नांदेड सीटीमधून देखील येथील पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करण्याात आली आहे.

येथील सूरज गजानन बाबर युवा मंच यांनी आवाहन केल्याप्रमाणे जमा झालेले साहित्य सांगली,आमणापूर,चोपडेवाडी, कोल्हापूर येथे रवाना करण्यात आले. पूरग्रस्तांना मानवतेच्या दृष्टीने मदत स्वरूपात पाठविण्यात आलेल्या साहित्यामध्ये धान्य, कपडे, औषधे,पिण्याचे पाणी व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून, 250 कुटुंबाचा किराणा आमणापुर ,चोपडेवाडी,250 कुटुंबाचा किराणा कोल्हापूर शहरात मंगळवारी (13 ऑगस्ट) हे साहित्य पाठविण्यात आले.

  • यावेळी सूरज बाबर,अर्चना बाबर,वीरेंद्र बर्गे,अजय कदम,संतोष बाबर,गौरी बाबर,प्रणव बर्गे,स्वप्निल शेटे,कौस्तुभ देशपांडे,सागर संकोळी,धीरज फाळके,गौरव साळुंखे, संतोष देगीनाळ,दीपक विटकरआदी उपस्थित होते.

सामाजिक अस्मितेचे भान ठेऊन आज प्लाम ब्रीझ, साई ड्रीमस, लक्षदीप पॅलेस, राजवीर पॅलेस, रोस आयकॉन, अल्कोव सोसायटी, दीपमाला सोसायटी, वसंत अव्हेनु, शिवम सोसायटी, यशदा सिद्धी, रोस वूड सोसायटी, जर्वरी सोसायटी, कुणाल आयकॉन, गणेशाम, या सोसायटी मधून वस्तुरूपामध्ये गहू, तांदूळ, कपडे, पाणी, खाद्यपदार्थ इत्यादी मदत तात्या बालवडकर अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विभाग “स्वाभिमानी शेतकरी संघटना” यांचा कडे सुपूर्त केली.

  • याप्रसंगी धनादेश (चेक) आणि रोख रक्कम किंवा वस्तुरूपामध्ये दिलेली मदत मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्त केली जाईल, कुंदा भिसे यांनी आश्वासन दिले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.