Pimpri: पिंपरी-चिंचवडकरांनो, शंभर टक्के मतदान करा, स्वाक्षरी मोहिमेद्वारे आवाहन

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा निवडणूकीत पिंपरी-चिंचवडकरांनी शंभर टक्के मतदान करून आपले कर्तत्व पार पाडावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते व सॉफलिंग दुकानाचे मालक अतुल भळगट, जितू जैन, राहूल भळगट यांनी दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी मतदान करण्याचे आवाहन करणारा फलक लावला. 
या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांनी या फलकावर स्वाक्षरी करून मतदान करण्याचा संकल्प केला.

सोमवारी (दि. २९) रोजी मावळ मतदारसंघात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. सॉफलिंग दुकानाचे मालक अतुल भळगट, जितू जैन, राहूल भळगट यांनी चिंचवडगाव, निगडी व वाकड येथील दुकानामध्ये मतदान करण्याचे आवाहन करणारा फलक लावला. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेवून आमच्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करणार असे सांगितले.  कल्याणी घोटकुळे, कुलदीप सिंग, रामा देवासे, सुरेश बिसनळ आदी नागरीकांनी  स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला.
परीक्षा संपल्याने शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे मतदान करून आपापल्या गावी जावे. यासाठी जनहितार्थ हा उपक्रम राबविल्याचे दुकानाचे मालक अतुल भळगट, जितू जैन, राहूल भळगट यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.