Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरामधील मातंग समाजाने एकत्र येणे काळाची गरज – विठ्ठल थोरात

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे .सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती पहाता पिंपरी चिंचवड शहरामध्ये मातंग समाजाची संख्या वाढत असताना मातंग समाजाच्या तरुणांमध्ये न्याय हक्कासाठी लढाई देण्याची गरज आहे . यासाठी मातंग एकता आंदोलन हि राज्यव्यापी संघटना कार्यरत आहे असे मत विठ्ठल थोरात यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर मातंग एकता आंदोलन संघटनेची बैठक घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बुवा कांबळे , हिरामण खवळे , रामदास कांबळे , आशाताई शहाणे , मिना कांबळे , संदिप जाधव , पोपट आरणे , विठ्ठल कळसे ,दत्ता थोरात ,कुंदन कसबे ,विष्णू दाखले ,राजू धुरंधरे ,तुकाराम उदगिरे , विठ्ठल शिंदे ,श्रावण बगाडे ,दशरथ सकट , ज्ञानेश्वर लोंढे , विनोद वावरे , संतौष रणसिंग , सुधाकर वावरे , केलास पाठोळे ,अण्णा कसबे , मधुकर गवारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य माजी गृहराज्यमंत्री व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा बागवे यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहराला लवकरच अध्यक्ष देण्यात येत आहे. त्या संदर्भात शहरातील संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी , शाखा अध्यक्ष सर्व समाज बांधव आदिंशी चर्चा करण्यात आली अनेक इच्छुकांनी आपली मते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक विशाल कसबे यांनी केले. सुत्रसंचालन नितिन घोलप यांनी केले. तर आभार कुंदन कसबे यांनी मानले . या बैठकीचे आयोजन विशाल कसबे , मोहन वाघमारे , दत्तु चव्हाण , नितिन घोलप आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.