Pimpri: पीएमपीएलकडून पिंपरी-चिंचवडला सापत्नपणाची वागणूक – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन मंडळ (पीएमपीएल) कडून पिंपरी-चिंचवड शहराला सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. महापालिका 40 टक्के अर्थसाहाय्य पीएमपीएलला देतो. परंतु, त्या तुलनेत सुविधा दिल्या जात नाहीत. पुरेशा बस देखील दिल्या जात नाहीत. बीआरटी मार्ग तयार असून देखील बस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. पीएमपीएमलकडून शहराला सातत्याने सापत्नपनाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप महापौर राहुल जाधव यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना महापौर जाधव म्हणाले, शहरातील विविध मार्गावरील बस अचानक बंद केल्या जातात. महापालिका पीएमपीला 40 टक्के अर्थसाहाय्य करते. परंतु, त्या तुलनेत सुविधा दिल्या जात नाहीत. पीएमपीएमएलकडून मुंबई-पुणे मार्गावर देखील मुबलक प्रमाणात बस उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. आजपर्यंत महापालिकेने पीएमपीएलला तब्बल 637 कोटी रुपये दिले आहेत. एवढे पैसे देऊन देखील सुविधा दिल्या जात नाहीत. शहारासाठी जादा बस उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत.

पीएमपीएमएलचे सुनील गवळी यांच्यावर गैरव्यहाराचा आरोप असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत गवळी यांच्याकडे वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार देण्यात येवू नये, अशी मागणी देखील महापौर जाधव यांनी केली. त्यांच्यानंतर वाहतूक विभागाचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ अधिका-याकडे पदभार देण्यात यावा.  याबाबत पीएमपीएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना पत्र देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.