Pimpri Crime News : घरातून फोन चोरणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून चोरट्याने (Pimpri Crime News) आयफोन चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजताच्या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

बिनय नलिनी विश्वास (वय 26, रा. संत तुकाराम नगर पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश बाबुराव बिराजदार (वय 34, रा. संत तुकाराम नगर पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Bye Elections : पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात  – राज ठाकरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वास त्यांचा 30 हजारांचा आयफोन मोबाईल चार्जिंगला लाऊन अंघोळीसाठी गेले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. घराच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून महेश याने आयफोन चोरून नेला. पोलिसांनी महेश याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस ( Pimpri Crime News) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.