Pimpri: पिंपरी गावठाण, भीमनगर, गणेशनगर, थेरगाव ‘कंटेन्मेट झोन’ घोषित

Pimpri Gaothan, Bhimnagar, Ganeshnagar, Thergaon declared 'Containment Zone : 'पुढील आदेशापर्यंत हा भाग सील असणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी पिंपरी गावठाण, भीमनगर, गणेशनगर, थेरगाव परिसर पालिकेकडून कंटेन्मेट झोन घोषित केला आहे. पुढील आदेशापर्यंत हा भाग सील असणार आहे.

पिंपरी गावठाण, थेरगाव भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिकेकडून रुग्ण वाढ होणारा भाग कंन्टेन्मेट झोन केला जातो.

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी गावठाणातील (पवनेश्‍वर मंदिर, कापसे चौक, शिवकृपा, पीसीएमसी कॉलनी, काशिबा शिंदे सभागृह), तसेच पिंपरी भीमनगरमधील (शिवाजी महाराज पुतळा-गंगवा चौक,-समृद्धी हॉटेल- सौदागर पूल काटे पिंपळे रस्ता) हे भाग सील करण्यात आले आहेत.

याशिवाय गणेशनगर, थेरगाव येथील (वाकड पोलीस स्टेशन चौक-शिवकॉलनी कमान- ओमकार कॉलनी लेन -2 – रत्नदीप कॉलनी- मयूरबाग कॉलनी- मयूरेश्‍वर गणेश मंदिर – लोकमान्य कॉलनी) हा परिसर कंटेन्मेट झोन घोषित केला आहे. पुढील आदेशापर्यंत हा भाग सील असणार आहे.

या परिसरात सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत जीवनावश्‍यक वस्तुंची खरेदी करता येणार आहे. तर, मेडीकल व दवाखाने पूर्ण वेळ खुली राहणार आहेत.

बाहेरुन ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थ मागविण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिसरातून नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.