Pimpri : बाणेर परिसरातील सराफ दुकानामध्ये जबरी चोरी, 12 तोळे सोनं आणि 12 किलो चांदी लंपास

एमपीसी न्यूज – पुण्यातील बाणेर परिसरातील एका सराफ दुकानामध्ये चोरटयांनी जबरी चोरी केली. चोरटयांनी तब्बल 12 किलो चांदी आणि 12 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. चतुशृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.