Pimpri : पिंपरीचे वकील सुशील मंचरकर यांची तक्रार भोवली; गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांसाठी सनद गेली

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील (Pimpri ) वकील सुशील मंचरकर यांच्या तक्रारीची दखल घेत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई करत त्यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने हा मोठा धक्का दिला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी येथील वकील सुशील मंचरकर यांनी सदावर्ते यांच्याबाबत बार कौन्सिल यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत तीन वकिलांच्या समितीने तपासणी करून गुणरत्न सदावर्ते यांच्यवर कारवाई करत सदावर्ते न्यायालयात दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवणार नसल्याचे जाहीर (Pimpri )केले. बार कौन्सिलच्या नियमांचे गुणरत्न सदावर्ते यांनी उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Vadgaon Maval: वडगाव भाजपाच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेला पाच संगणक संच भेट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.