Pimpri : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा समावेश बांधकाम कल्याण मंडळात करु नये – यशवंत भोसले

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तातडीने बंद करण्याचा भांडवलदारांचे षडयंत्र सुरु आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि बांधकाम कामगार कल्याण या दोन्ही मंडळाचे अस्तित्व बंद करु नये. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अस्तित्व स्वतंत्र आहे. ते बांधकाम कल्याण मंडळात समाविष्ट करु नये, असा ठराव राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे झालेल्या गुणवंत कामगार परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत झाला.

पिंपरीतील संत तुकारामनगर येथील संत तुकाराम प्रतिष्ठान येथे गुणवंत कामगार परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माजी संचालिका भारती चव्हाण, शिवाजीराव शिर्के, रामकृष्ण राणे, राजेश हजारे, सुनील अधाटे, श्रीकांत जोगदंड, स्वानंद राजपाठक, सतीश देशमुख, अनिल पालकर, बशीर मुलानी, भरत शिंदे, संजय गोळे, गोरख वाघमारे, पंकज पाटील, प्रकाश घोरपडे, तानाजी एकोडे, कल्पना भाईगडे, आश्फिया सय्यद, लक्ष्मण इंगवले आदी उपस्थित होते.

  • यशवंत भोसले पुढे म्हणाले, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा समावेश बांधकाम कल्याण कामगार मंडळात करु नये याला आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत विरोध करण्यात आला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांना एसटीमध्ये पती-पत्नीस मोफत पास, रेल्वे पास सवलत, टोलमाफी, गुणवंत कामगारांमधून आमदार निवडला जावा, कामगारांना स्मार्टकार्ड, औषधोपचार, सेवानिवृत्त गुणवंत कामगाराला दहा हजार रुपये मानधन, म्हाडामध्ये घरे, गुणवंत कामगाराला स्विकृत नगरसेवक आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
_MPC_DIR_MPU_II

1979 सालामध्ये गुणवंत पुरस्कार शासनाने सुरु केले. 2015 ते 2019 या पाच वर्षामध्ये पुरस्कार दिले नाही. कामगार केंद्रे बंद केले. कामगारांच्या मागण्यांसाठी एकत्र येऊन त्यांना तो अधिकार मिळालाच पाहिजे, यासाठी लढावे लागले तरी लढणार. तसेच कामगार दिंडी, कामगार साहित्य संमेलन यासारख्या कार्यक्रमही झाले नाही. ते सुरु करावेत, कायम स्वरुपी कामगाराच्या जागी कंत्राटी कामगार भूमिका वाढत चालली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बंद केले तर उद्याचा कामगारही जन्माला येणार नाही. गुणवंत पुरस्कारही संपुष्टात येतील. त्यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र ठेवावे ते बांधकाम कायद्यात समाविष्ट करु नये, असा ठराव यावेळी करण्यात आलाव त्याला सर्व गुणवंत कामगारांनी अनुमती दर्शविली.

  • यावेळी सुहास वड्डीकर, रमेश बनसोजे, भगवान माने, गजानन गायकवाड, गणेश कळकटे, तात्यासाहेब भोसले, मुरलीधर चिंचकर, दादा काळे यांनी मागण्यां सादर केल्या.

बैठकीच्या अध्यक्षा भारती चव्हाण म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अस्तित्व स्वतंत्र ठेवावे, या ठरावाला कामगारवर्गांनी अनुमती दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे तातडीने बंद करण्याचे घाट सुरु आहेत. कामगार कल्याण मंडळाचे उपक्रम पूर्ववत सुरु व्हावेत हा उद्देश असून गुणवंत कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, याकरिता अधिवेशनात शासनाला मागणीपत्र सादर करण्यात येईल. कामगार कल्याण मंडळ भविष्यात टिकले पाहिजे त्यासाठी लढा उभारुन वेळप्रसंगी कामगार आयुक्तांना या मागण्यांसाठी घेराव घातला जाईल. गुणवंत कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी सर्व जिल्हा संघटनांना एकत्र करुन गुणवंताची ताकद शासनाला दाखवून देणार आहोत. कामगारांच्या मागण्या मान्य होण्यासाठी ही राज्यस्तरीय परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • दरम्यान, जम्मू काश्मीर सीआरपीएफच्या शहीद जवांनाना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वानंद राजपाठक यांनी केले. सूत्रसंचालन राज अहिरराव यांनी केले. आभार अनिल पालकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.