Pimpri : गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे पथसंचलन

उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. : Pimpri police routemarch on ganeshotsav And Moharam

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती असलेल्या पिंपरी परिसरात आज (बुधवारी, दि. 19) पिंपरी पोलिसांनी पथसंचलन केले. उत्सव काळात अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सज्ज असायला हवे, यासाठी पोलिसांनी रंगीत तालीम देखील केली.

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक आणि 50 पोलीस कर्मचारी आजच्या पथसंचलनात सहभागी झाले.

हे पथसंचलन पिंपरी कॅम्प येथील डिलक्स चौक, मिलिंद नगर, रिव्हर रोड, आंबेडकर नगर, बौद्ध नगर, पिंपरी मुख्य बाजारपेठ, शगुन चौक या मार्गावरून करण्यात आले.

पिंपरी परिसर हा शहराचा मध्य भाग आहे. शहरातील कुठल्याही घटनेचे पडसाद या परिसरात उमटतात. त्यामुळे पिंपरी पोलिसांना कायम दक्ष राहावे लागते.

दोन दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. तर 30 ऑगस्ट रोजी मोहरम आहे. दोन्ही उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.

डिलक्स चौकात पोलिसांनी दंग्यांवर नियंत्रण मिळविण्याचे  प्रात्यक्षिक  केले. यामध्ये सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांनी सहभाग घेतला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व सण साजरे करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.

गणेशोत्सवात देखील शासनाने अनेक नियम लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जाणार आहे. त्याची तयारी म्हणून पिंपरी पोलिसांनी हे पथसंचलन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.