Pimpri : क्रिकेट खेळण्यावरून टोळक्याची तरुणांना मारहाण

एमपीसी न्यूज- क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या भांडणात एका टोळक्‍याने तरुणांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) सायंकाळी पिंपरी येथे घडली.

अझहर नशीबउल्ला चौधरी (वय 34, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम वाघमारे (वय 25) व त्याचे 14 साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अझहर हे आपल्या मित्रांसोबत यशवंतनगर, पिंपरी येथे क्रिकेट खेळ होते. त्यावेळी आरोपी प्रेम वाघमारे हा फिर्यादी व त्याचे मित्र खेळत असलेल्या ठिकाणाहून मधून जात होते. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. तुम्ही मैदानात जाऊन खेळा, असे आरोपी म्हणाला असता त्यावर फिर्यादी यांनी तुम्हाला बाजूने जाता येत नाही का, अशी विचारणा केली.

यामुळे संतापलेल्या आरोपीने आपल्या साथीदारांना बोलावून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना स्टंपने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या मेहुण्यास स्टम्प आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.