Pimpri : सिगारेटचा धूर महिलेच्या तोंडावर सोडत केली शिवीगाळ

एमपीसी न्यूज- महिलेच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडल्याने तिने याबाबत विचारणा केली. यामुळे जाब विचाणाऱ्या महिलेलाच शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर ब्लेडने वार केले. ही घटना पिंपरी येथे घडली.

दीपक मधुकर करे (वय 20), विशाल मधुकर करे (वय 24, दोघेही रा. निराधार नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. स्वाती विकास जाधव (वय 23, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फियार्दी स्वाती या राहत्या घराबाहेर उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी दीपक करे याने सिगारेट ओढून धूर स्वाती यांच्याकडे सोडला. याबाबत स्वाती यांनी विचारणा केली असता त्याने शिवीगाळ केली. स्वाती यांच्या भावाने शिवीगाळीचा जाब विचारला असता आरोपींनी आपसांत संगनमत करून भावास मारहाण केली. तसेच ब्लेडने वार करीत गंभीर जखमी केले. पोलीस हवालदार ढमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.