Pimpri : पिंपरी पोलिसांकडून चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना तडीपार केले. या कारवाईमुळे पिंपरी पोलीस ठाण्यातून सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आकडा 15 वर गेला आहे.

चारुदत्त हिराचंद खुडे (वय 28, रा. काटे पिंपळे रोड, पिंपरीगाव), आशिष उर्फ गोल्डन मिलिंद हिवाळे (वय 21, रा. पिंपरीगाव), लहू ज्ञानेश्वर तिकोणे (वय 48, रा. काळेवाडी) आणि तुषार बाबू मंजाळकर (वय 24, रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यांची शहरात गुन्हेगारी फोफावली होती. त्यामुळे शहरात त्यांची दहशत पसरत होती. पिंपरी पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करत तडीपार केले आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी नवीन पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यापासून पिंपरी पोलीस ठाण्यातून 15 गुन्हेगारांवर तडीपारीची तर एका गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस शिपाई सुहास डंगारे, गणेश कर्पे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.