Pimpri: आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त, 900 जणांना डिस्चार्ज, 629 नवीन रुग्ण, 16 मृत्यू

Pimpri: Today more corona-free patients than new patients, 900 discharged, 629 new patients, 16 deaths

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 900 जणांना आज (मंगळवारी) घरी सोडण्यात आले. तर, शहराच्या विविध भागातील 629 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 24 हजार 311 वर पोहोचली आहे.

आज 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आकुर्डीतील 79 वर्षीय वृद्ध, चिंचवड येथील 86 वर्षीय महिला, निगडीतील 66, 72 वर्षीय दोन पुरुष, कासारवाडीतील 47 वर्षीय महिला, पिंपळे गुरव येथील 98 वर्षीय वृद्ध, किवळेतील 70 वर्षीय पुरुष, भोसरीतील 68 वर्षीय पुरुष, पिंपळेसौदगर येथील 43 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 54 वर्षीय पुरुष, इंद्रायणीनगर भोसरीतील 74 वर्षीय वृद्ध, मोशीतील 59 वर्षीय पुरुष, सांगवीतील 77 वर्षीय पुरुष, तळेगाव दाभाडे येथील 35 वर्षाचा युवक, देहुरोड येथील 65 वर्षीय पुरुष आणि म्हाळुंगेतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 24 हजार 311 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 17, 106 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 408 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 97 अशा 505 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3783 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल  !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 929

# पॉझिटीव्ह रुग्ण – 629

#निगेटीव्ह रुग्ण – 300

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1520

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3783

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1690
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -24,311
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3783
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 505
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -17,106
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23481
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 77245

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.