_MPC_DIR_MPU_III

Pimpri: विभागप्रमुखाच्या प्लाझ्मा दानाने शिवसेनेच्या ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियानाचा शुभारंभ

Plasma donation of the devision head launches Shiv Sena's 'Plasma Donation Resolution' campaign शिवसेनेचे दापोडी-बोपखेलचे विभागप्रमुख राजू सोलापूरे यांनी आज प्लाझ्मा दान केला

एमपीसी न्यूज –   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शिवसेनेतर्फे आजपासून ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियानास सुरुवात करण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्या शिवसेना विभागप्रमुखाने स्वत: प्लाझ्मा दान करत या अभियानाचा शुभारंभ केला.

_MPC_DIR_MPU_IV

मुख्यमंत्री ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेतर्फे आजपासून 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2020 दरम्यान ‘चला कोरोनाला हरवूया, चला प्लाझ्मा दान करुया’ या मोहिमेअंतर्गत ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या अभियानाचा शुभारंभ शिवसेनेच्या पदाधिका-याने प्लाझ्मा दान करुन केला. कोरोनावर मात केलेले शिवसेनेचे दापोडी-बोपखेलचे विभागप्रमुख राजू सोलापूरे यांनी आज प्लाझ्मा दान केला आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेच्या प्लाझ्मा दान अभियानास आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनामुक्त शिवसैनिकाने याचा शुभारंभ केल्याचा आनंद आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती घेतली जात आहे. त्यांच्याशी संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करत आहोत.

प्लाझ्मा दान करु इच्छिणा-याला वायसीएममध्ये नेण्याची आणि घरी सोडण्याची सोय केली आहे. जास्तीत-जास्त प्लाझ्मा गोळा करुन प्लाझ्मा बँक तयार केली जाणार आहे. जेणेकरुन अनेक रुग्णांना प्लाझ्मा देऊन कोरोनातून मुक्त करण्यास मदत होईल.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.