Pimpri : शहरात बुधवारपासून ‘प्लास्टिकमुक्त, पर्यावरणयुक्त घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’; इच्छुकांना सहभागी होण्याचे आवाहन

स्वामी विवेकानंद विचारमंच आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन

एमपीसी न्यूज – स्वामी विवेकानंद विचारमंच चिंचवड आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती चिंचवड यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरवासियांसाठी ‘प्लास्टिक हटाओ, पर्यावरण बचाओ’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरासाठी, प्रत्येक घरगुती गणेशोत्सवांसाठी “प्लास्टिकमुक्त, पर्यावरणयुक्त घरगुती गणेशोत्सव स्पर्धा-२०१९” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी बुधवारी (दि.04 सप्टेंबर 2019) दुपारी ठीक 1.00 वाजेपर्यंत प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज आणि नियमावली क्रांतीतीर्थ, क्रांतीवीर चापेकर वाडा, राम आळी, चिंचवडगांव येथे उपलब्ध असतील. तरी अधिकाधिक कुटुंबियांनी आपले घरगुती गणेशोत्सव “प्लास्टिकमुक्त, पर्यावरणयुक्त घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2019” मध्ये सहभागी करवून राष्ट्रार्पित ‘प्लास्टिक हटाओ, पर्यावरण बचाओ’ या उपक्रमास हातभार लावावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेची नियमावली पुढीलप्रमाणे :
१) स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क रु.१५१/- (अक्षरी रु. एकशे एकावन्न) क्रांतीवीर चापेकर वाडा किंवा खाली नमुद केलेल्या प्रतिनिधींकडे जमा करणे आवश्यक आहे.
२) सदर स्पर्धा ही केवळ घरगुती गणेशोत्सवांसाठीच आहे.
३) आपला घरगुती गणेशोत्सव हा प्लास्टिकमुक्त व पर्यावरणयुक्त असावा याची सर्वस्वी जबाबदारी स्पर्धकांनी स्वतः घेणे अत्यावश्यक आहे.
४) एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही.
५) प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल.
६) प्लास्टिकमुक्त व पर्यावरणयुक्त सर्वोत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव हे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसपात्र पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतील.
७) गणेशोत्सव कालावधीत स्पर्धा संयोजन समितीचे पदाधिकारी व परिक्षक स्पर्धकास पुर्वकल्पना देवूनच आपल्या घरगुती गणेशोत्सवास भेट देतील.
८) परिक्षण अहवालाकरिता परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
९) स्पर्धेत सहभागी होण्याकरिता बुधवार (दि.04 सप्टेंबर 2019) पर्यंत प्रवेश शुल्कासह स्पर्धकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
१०) स्पर्धेसाठीचे प्रवेश शुल्क आपण रोखीने किंवा ऑनलाईन पध्दतीने गुगलपे / फोनपे द्वारे 8600007801 किंवा पेटीएम द्वारे 8421440950 या नंबरवर अदा करु शकता, तशी पुर्वसुचना स्पर्धकाने देणे बंधनकारक आहे.
११) स्पर्धेविषयी अधिक तथा सविस्तर माहितीकरिता सिध्दनाथ घायवट – 8421440950, प्रा.डाॅ.अर्चना आहेर- 8888887519, योगेश्वरी महाजन- 9975773940, सुरेखा वागळेकर- 9921185065, नितीन बनाईत- 9764001799, अतुल आडे- 8975782196 या व्यक्तींशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.