BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडूंचा गौरव

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणा-या खेळाडूंचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या सत्कार सोहळ्याला नगरसेवक विलास मडिगेरी, विकास डोळस, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, मोरेश्वर भोंडवे, अमित गावडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर, अर्चना बारणे, यशोदा बोईनवाड, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील उपस्थित होते.

मंगोलिया येथे झालेल्या आशियाई क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अक्षया शेडगे हिने सुवर्णपद पटकाविले आहे. त्यानिमित्त महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.