Pimpri : पेटीएम केवायसी अपडेट करण्यासाठी सांगितलेली ‘ही’ अॅप्लिकेशन मुळीच डाऊनलोड करू नका 

एमपीसी न्यूज – पेटीएम केवायसी अपडेट करावयाची आहे असे सांगून विविध ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जाते. मात्र ही अॅप्लिकेशन मुळीच डाऊनलोड करू नका कारण ही आपलिकेशन तुमच्या मोबाईलमधील ॲक्सेस घेऊन व माहितीच्या आधारे तुम्हाला आर्थिक गंडा घालू शकतात. तेव्हा ऑनलाईन माहिती चोरणाऱ्या पासून सावध राहण्याचे सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन पद्धतीने माहिती चोरणारे तुम्हाला
Any Desk, Quick Support, TeamViewer अशा प्रकारचे मोबाईलचा ॲक्सेस घेणारे अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगून आपल्या मोबाईलचा अॅक्सेस घेतात आपली आपली आर्थिक फसवणूक करताय. असे आर्थिक फसवणुकीचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. अशा प्रकारचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करू नये तसेच कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये, असे सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.