Pimpri : पंतप्रधान मोदींनी ‘मेणबत्ती’चे वक्तव्य मागे घ्यावे – अजय लोंढे

एमपीसी न्यूज – कोरोना या जागतिक महामारीमुळे देशावर आपत्ती ओढवली आहे. या परिस्थितीत 5 एप्रिलला मेणबत्ती, मोबाईल फ्लँश लाईट लाऊन 9 मिनिटे थांबण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. त्यांच्या वक्तव्याला कोणताच वैज्ञानिक आधार दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी आपले विधान जाहिरपणा मागे घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय लोंढे यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या तडकाफडकी लॉकडाऊन जाहीर करण्याच्या भूमिकेमुळे नोटबंदीप्रमाणे सर्वसामान्यांची प्रचंड कोंडी झाली. लाखो माणसे आपल्या परिवारासह राज्यांतर्गत व राज्याबाहेर घरी जाण्यासाठी पायी प्रवास करत आहेत. असंख्य लोकांना सुविधांबाबत गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच उपिसमारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे लोंढे यांचे मत आहे.

तसेच कोरोना पार्श्वभूमीपर आजवर देशासाठी राज्यासाठी आलेली मदत लोकांपर्यंत पोहचवून, यापुढे राष्ट्रीय आपत्ती साठी स्वतंत्र मोठ्या रकमेच्या बजेटची तरतुद करण्यात यावी. राष्ट्रीय आपत्तीत पहिल्याच दिवशी थेट लाभार्थ्यांना मदत सहकार्य कसे देता येईल, याचे नियोजन झाले पाहिजे, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.