Pimpri: लेखा परीक्षणातील आक्षेपांची केंद्र सरकारने घेतली दखल; चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचड महापालिकेच्या लेखापरीक्षणातील आक्षेपांची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. प्रलंबित असलेल्या 38 हजार 318 आक्षेप प्रकरणांच्या चौकशीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख राजीव रंजन यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखा परीक्षणाबाबत 1999 मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार 18 वर्षांचे लेखापरीक्षण केले होते. लेखापरीक्षणातील आक्षेपाधीन रकमेबाबत काय कारवाई करणार याबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. याबाबत भापकर यांनी आक्षेपाबाबत तक्रारी दिल्या. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे महापालिकेच्या लेखापरीक्षणातील ३ 010 कोटींच्या गैरकारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून कायद्याप्रमाणे कारवाई करावी, यासाठी भापकर यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली.

लेखापरीक्षणातील आक्षेपाबाबत कार्यवाही न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, वसूलपात्र रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, याबाबत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी भापकर यांनी केली होती. त्यानुसार पीएमओ कार्यालयाने राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. तसेच याप्रकरणी दखल घेऊन उचित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना राजीव रंजन यांनी सरकारला केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.