BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पीएमपीएमएल बस रस्त्याच्या दुभाजकात घुसली

दापोडी सॅण्डविक कंपनीसमोरील घटना

396
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका पीएमपीएमएल बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने थेट रस्त्याच्या रस्ता दुभाजकात घुसली. रविवारी (दि.२४) दुपारी साडे बाराच्या सुमारास दापोडी येथील सॅण्डविक कंपनीसमोर ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

कात्रजहून निगडीच्या दिशेने जात असणारी पीएमपी बस दापोडी येथील सॅण्डविक कंपनीसमोर आली असता बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बसचे स्टेरिंग लॉक झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट बीआरटी मार्गातील रस्ता दुभाजकाला धडकून बंद पडली. बस बंद पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

सुदैवाने यामध्ये बसचे नुकसान झाले असून एकही प्रवाश्याला इजा झाली नाही. दरम्यान, बसमध्ये तांत्रिक बिघाड तसेच बस भर रसत्यात बंद पडण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडल्याने प्रवाश्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.