Pimpri: पिंपरीगाव ते हडपसर, पिंपरीगाव ते हिंजवडी फेज 3 बस सेवा सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरीगावातून विविध मार्गावर पीएमपीएलच्या बसेस सुरू करून सार्वजनिक वाहतूक सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू असे, आश्वासन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले.

पीएमपीएमएलच्या वतीने पिंपरीगाव ते हडपसर शेवाळवाडी तसेच पिंपरीगाव ते हिंजवडी फेज 3 बस मार्गाचा शुभारंभ नगरसेवक वाघेरे व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी वाघेरे बोलत होते. पीएमपीएमएलचे मुख्य समन्वयक अधिकारी संतोष माने, वाहतूक निरीक्षक कृष्णा सोनवणे, वाहतूक नियोजन उत्तरेश्वर बळे, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, शारदा मुंडे, रंजना जाधव, सामाजिक कार्यकर्ते संदीप गव्हाणे, महादेव वाळुंजकर, ज्येष्ठ नागरिक सुधाकर यादव, मुरलीधर जगताप, नामदेव कुदळे, अमित कुदळे, हरीश वाघेरे, श्रीकांत वाघेरे, रुपेश वाघेरे, संजय गायके आदी उपस्थित होते.

पिंपरीगावचा विस्तार झाला आहे; मात्र गावातून पूर्व पीसीएमटीच्या काळात सुरू झालेले मार्गही बंद झाले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली. प्रवासी खासगी साधनांकडे वळाले आहेत. पीएमपीएलला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देणे गरजेचे आहेत. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बस मार्ग सुरू रहावेत यासाठी प्रवाशांनी या मार्गावर बसने प्रवास करावा. अन्यथा प्रतिसाद न लाभल्याने पिंपरीगाव ते पंढरपूर एसटी बंद झाली तसे होऊ नये याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. माजी नगरसेविका गिरीजा कुदळे यांनी सर्वच मार्गावरील बसेसचे वेळापत्रक बसस्टॉप वर लावावे अशी सूचना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.