Pimpri: पीएमपीएमएलच्या चार बसमार्गांचा विस्तार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या चार मार्गावर पीएमपीएमएल बस मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच दोन नवीन मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

नगरसेवक व पीएमपीएमएल अधिका-यांची नुकतीच एक बैठक झाली होती. नगरसेवकांनी काही नवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्यासह विस्तार करण्याची सूचना केली होती. याची दखल घेत पीएमपीएमएल प्रशासनाने निगडी देहू-निगडी वतुर्ळाकार मार्गे 10 बस, भोसरी ते हिंजवडी वायसीएम मार्गे, पिंपळे निलख ते निगडी विशालनगर, कस्पटे वस्ती-थेरगाव मार्गे अशा बस सुरू केल्या आहेत.

पुणे मनपा ते शिवसृष्टी चौक जाधववाडी चिखलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. दि. 5 नोव्हेंबर रोजी पिंपरीगाव ते हिंजवडी मान फेज थ्री काळेवाडी, डांगे चौक मार्गे नवीन बस सेवा तर शेवाळवाडी ते पिंपरी मनपा या बस मर्गाचा पिंपरीगावापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.