Pimpri : पीएमपीएमल प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाकडून अधिका-यांवर केलेल्या कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पीएमपीएमएलमध्ये मनमानी पद्धतीने कारभार सुरु असल्याचा आरोप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे, पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाचा गलथान कारभार सुरु आहे. प्रशासन मनमानी पद्धतीने काराभार करत आहे. याला वेळीच आवर घालवा लागणार आहे. पीएमपीएमलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईच्या कागदपत्रांची प्रत तसेच माहिती वारंवार मागितली आहे. परंतु, प्रशासन विभागाने आजपर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही.

याउलट चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांवर मेहरबान होऊन त्यांना पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील संचालक व पदाधिकारी यांचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त केले आहे. वास्तविक पाहता यासाठी एका अधिका-याची समन्वयकपदी नेमणूक केली आहे. असे असताना कोणत्या अधिकाराने व कोणती आहर्ता व पात्रता पडताळून जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचा खुलासा करण्याची मागणी वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.