Pimpri: दिव्यांगांच्या पीएमपीएमएल पासला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – ‘मी कार्ड’च्या नूतनीकरणासाठी 15 एप्रिल 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे पीएमपीएमएल व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले आहे.

पीएमपीएमएलतर्फे प्रवाशांसाठी सन 2018-19 या वर्षासाठी ‘मी कार्ड’ योजनेंतर्गत मी कार्ड पासेस वितरीत करण्यात आले आहेत. त्याचा लाभ दिव्यांग नागरिक, केंद्र व राज्य शासनातर्फे विशेष प्राविण्य मिळालेल्या व्यक्ती, तसेच स्वातंत्र्य सैनिकानी घेतला आहे. या ‘मी कार्ड’ पासची मुदत 31 मार्च रोजी संपलेली आहे.

या पासच्या नूतनीकरणाची मुदत 15 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यावेळेपर्यंत ‘मी कार्ड’ पासधारक दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, तसेच विशेष प्राविण्य प्राप्त व्यक्ती यांच्याकडून प्रवासादरम्यान तिकिट घेउ नये, तसेच त्यांना कोणताही दंड आकारू नये, असे निर्देश पीएमपीएमएल प्रशासनातर्फे वाहक, तिकिट तपासनीस यांना देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.