Pimpri : महापालिका आयुक्तपदाचा पदभार ‘पीएमआरडीए’आयुक्‍तांकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर येत्या 3 जूनपर्यंत रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आयुक्तपदाचा पदभार पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची उत्तरप्रदेशात निरीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता आयुक्‍त हर्डीकर आठवडाभर रजवेर गेले आहे. त्यामुळे पीएमआरडीएचे आयुक्‍त विक्रम कुमार यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त मनोज लोणकर हे सोमवारपासून (दि.27) 2 जूनपर्यंत रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीच्या काळात महापालिका कामकाजाचा खोळंबा होऊ नये, याकरिता त्यांच्या पदाचा अतिरिक्‍त पदभार भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्‍त मंगेश चितळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच “फ’ क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्‍त पदभार प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.