Pimpri: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त पिंपरीत उद्या कवी संमेलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी तील नामवंत कवींचे उद्या (मंगळवारी) कवी संमेलन आयोजित केले आहे.

पिंपरीतील, आचार्य अत्रे रंगमंदिरात मंगळवारी (दि. १४) सायंकाळी पाच वाजता संमेलन होणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासनाने 1 ते 15 जानेवारी दरम्यान भाषा संवर्धन पंधरवडा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत.

या कवी संमेलनामध्ये ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, अरुण पवार, भरत दौंडकर, बंडा जोशी, अनिल दीक्षित, प्रशांत मोरे आदी कवी सहभागी होणार आहेत. विनामूल्य असणाऱ्या या कवी संमेलनास पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

तसेच या निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा संवर्धन विषयक वक्तृत्व व निबंध स्पर्धेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.