Pimpri : कवींनी कवितेवर मनांपासून प्रेम करावे – विष्णू जोशी

'चला जाऊ या' ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी उपक्रम

एमपीसी न्यूज – ‘शब्दधन काव्यमंच’ संस्थेने ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी विष्णू जोशी (वय वर्षे ७९) यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षिका मंगला तुकाराम पाटील होत्या. मुरलीधर दळवी,बाबू डिसोजा,माधुरी डिसोजा, आनंद मुळुक, भाऊसाहेब गायकवाड, शरद काणेकर, वैशाली जोशी यावेळी उपस्थित होते.

विष्णू जोशी यांचा परिचय आणि पिंपरी चिंचवड शहराच्या साहित्यिक वाटचालीत त्यांनी दिलेले योगदानाची कवी विवेक कुलकर्णी यांनी माहिती दिली. विष्णू जोशी यांच्या कवितांचे ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम पाटील लिखित रसग्रहणाचे वाचन ज्येष्ठ कवी कैलास भैरट यांनी केले. ‘ना मूंह छुपाके जिओ और न सर झुकाके जिओ’, ‘गमोंका दौर भी आये तो मुस्कुराते जिओ’ हे गीत बाळासाहेब घस्ते यांनी सादर केले.

विष्णू जोशी आणि सुलभा जोशी यांचा यथोचित सत्कार मंगला पाटील यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मंगला पाटील म्हणाल्या, “दिवा कधीच स्वतः बद्दल बोलत नाही. त्याचा प्रकाशच त्याचा परिचय करुन देत असतो, असेच जोशी यांचे कार्य आहे.”

सत्काराला उत्तर देताना विष्णू जोशी म्हणाले, “कवींनी कवितेवर मनापासून प्रेम करावे. उत्तम निरीक्षण करावे. उत्तम सादरीकरण शिकावे.”
शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, नंदकुमार मुरडे, अशोक कोठारी, सविता इंगळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुभाष चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी विधाटे यांनी केले आणि आभार निशिकांत गुमास्ते यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.