Pimpri : दारू पिऊन वाहन चालविणा-या 119 तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 31 डिसेंबर रोजी मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या 119 तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शहरातील नऊ वाहतूक विभागात करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांसह ड्रंक अॅंड ड्राइव्हवर सुद्धा पोलिसांची करडी नजर आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दारू पिऊन वाहन चालविणा-यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी (दि. 30 डिसेंबर) पोलिसांनी 127 तर सोमवारी (दि. 31 डिसेंबर) 119 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे धोक्याचे आहे. यामुळे अनेकदा अपघात होतात. फक्‍त 31 डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यास मोठा विरोध होतो. यामुळे गुरुवारपासूनच (दि. 27) मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती.

वाहतूक विभाग आणि कारवायांची संख्या –

निगडी वाहतूक विभाग – 06
चिंचवड वाहतूक विभाग – 10
चाकण वाहतूक विभाग – 03
भोसरी वाहतूक विभाग – 19
पिंपरी वाहतूक विभाग – 16
हिंजवडी वाहतूक विभाग – 53
दिघी वाहतूक विभाग – मशीन उपलब्ध नाही
देहूरोड वाहतूक विभाग – 09
तळवडे वाहतूक विभाग – 03

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.