Pimpri : पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या आरोपीला पिंपरी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – रेल्वे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

नदीम गफूर शेख (वय 19) असे पुन्हा अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे पोलिसांनी आरोपी नदीम याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी रेल्वे पोलीस आरोपीला घेऊन बुधवारी दुपारी शेवाळे सेंटर कंपनीच्या आवारात पिंपरी येथे आरोपीच्या घराजवळ आले होते. त्यावेळी आरोपीचे नातेवाईक तिथे आले. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. पोलिसांच्या तपासात अडथळा आणून गोंधळ निर्माण केला. या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी नदीम याने पोलिसांच्या तावडीतून सुटून धूम ठोकली.

पोलिसांनी आरोपी नदीमसह त्याच्या नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पिंपरी पोलिसांनी दोन पथके तयार केली. पोलीस शिपाई उमेश वानखेडे यांना माहिती मिळाली की, हा आरोपी नव महाराष्ट्र शाळा पिंपरी गाव येथे बस स्टॉपवर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. त्यावेळी आरोपी नदीम एका बसमधून आला. त्याला पोलिसांनी पुन्हा अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक निमगिरे, पोलीस कर्मचारी नागनाथ लकडे, अनिल गायकवाड, जावेद बागसिराज, अजिनाथ सरक, सोमेश्वर महाडिक, उमेश वानखेडे, रमेश दोरताले, शहाजी धायगुडे, ओंकार बंड, सुहास डंगार, गणेश करपे यांच्या पथकाने केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like