Pimpri : मद्यप्राशन करून महापालिकेचा अधिकारी असल्याचा पोलिसांना दम; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – संचारबंदी सुरू असताना दुचाकीवरुन फिरून मद्यप्राशन करत पोलिसांनी अडविल्यानंतर त्यांना आपण महापालिकेचा अधिकारी असल्याचा दम दिला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री आठच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली.

संदीप बबन उंद्रे (वय 33), हिमांशू सिंग (वय 24, रा. लिंक रोड, चिंचवड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई रावसाहेब जिजाबा खोडदे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पोलीस स्टाफसह शगुन चौक, पिंपरी येथे बंदोबस्त ड्युटीवर हजर होते. दरम्यान लोकांची गर्दी झाल्याचे पाहून फिर्यादी यांनी लोकांना घरी जाण्याबाबत तसेच कोरोनाच्या साथीचा प्रसार होऊ नये याबाबत काळजी घेण्याबाबत सांगितले. त्यावेळी उड्डाणपुलावरून एक मोटारसायकल (एम एच 14 / जी डब्ल्यू 5948) शगुन चौकाकडे आली.

दुचाकीचा चालक वेडीवाकडी दुचाकी चालवत होता. त्यावेळी बंदोबस्त ड्युटीवर असलेले वाहतूक शाखेचे वाॅर्डन यांनी त्या दुचाकीस्वाराला थांबवून ‘तुम्ही मास्क का वापरला नाही’ असे विचारले. त्यावेळी आरोपी संदीप म्हणाला, ‘मी कोण आहे माहित आहे का तुम्हाला.

मी कार्पोरेशनचा मोठा अधिकारी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो’. असे म्हणून त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावले. आरोपी मद्यप्राशन करून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.