Pimpri : पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; दोघांना अटक, दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 6) रात्री पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. 

राहुल उर्फ भडज्या अर्जुन गोरे (वय 24, रा. चेतन शिवले चाळ, भोंडवे वस्ती, वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि स्वप्नील उर्फ बाळू नामदेव शेलार (वय 26, रा. दत्त नगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिसांनी गुरुवारी रात्री अकरा ते मध्यरात्री अडीच पर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविले. त्यावेळी सराईत गुन्हेगारांना पिंपरी पोलिसांनी तडीपार केले आहे. पिंपरी पोलिसांनी तडीपार केलेले आरोपी तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री अकरा वाजता सापळा रचून मिलिंदनगर मधून राहुल याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याच्याकडे 7 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचा एक गावठी कट्टा जप्त केला. त्यानंतर रामनगर चिंचवड मधून स्वप्नील याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे 31 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींवर आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, शाकीर जिनेडी, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, राजू जाधव, पोलीस शिपाई संतोष भालेराव, रोहित पिंजरकर, उमेश वानखेडे, विद्यासागर भोते, अविनाश देशमुख, गणेश खाडे, नामदेव राऊत, गणेश करपे, सोमेश्वर महाडिक, विकास रेड्डी, विष्णू भारती, महिला पोलीस शिपाई कीर्ती घारगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.