Pimpri : पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण;आतापर्यंत सात पोलीस बाधित

0

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कोरोना रिपोर्ट आज शनिवारी  पॉझिटीव्ह आला. शहरात आतापर्यंत सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 18 मे रोजी कोरोनाची लागण झालेला एक सहायक पोलीस निरीक्षक कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कोरोना रिपोर्ट शनिवारी पॉझिटीव्ह आला. या हवालदाराला थेरगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच पोलीस ठाण्यातील एका महिला फौजदारालाही यापुर्वी कोरोनाची लागण झाली आहे.

18 मे रोजी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका विभागात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली होती. या सहायक निरीक्षकाचा रिपोर्ट शनिवारी निगेटीव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.  शहरात आतापर्यंत एकूण सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

पोलीस चौकीत आणलेल्या एकाला कोरोना; पाच पोलीस कर्मचारी क्वारंटाईन

भांडणाच्या प्रकरणात शहरातील एका पोलीस चौकीत आणलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पाच पोलीस कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

19 मे रोजी दोन भावंडाचा घरगुती वाद पोलीस चौकीपर्यंत पोहोचला. पोलीसांनी एकाची अदखलपात्र तक्रार घेतली. तर, दुसर्‍याला नोटीस बजावत समजूत काढून घरी पाठवून देण्यात आले. यापैकी, एकाला दुसर्‍या दिवशी सर्दी आणि खोकला झाल्याने तो औंध येथील जिल्हा रुग्णालयात गेला. तपासणीत 21 मे रोजी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like