Pimpri : रावण टोळीच्या म्होरक्याला श्रद्धांजली वाहण्याचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज – रावण टोळीच्या म्होरक्याला श्रद्धांजली वाहण्याचा डाव पोलिसांनी उधळला. रावण टोळीचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा 20 नोव्हेंबर 2017 रोजी महाकाली आणि सोन्या काळभोर टोळीने खून केला होता. त्याच्या स्मृतिदिनी कार्यक्रमाच्या नावाखाली दहशत निर्माण करण्याचा रावण टोळीचा डाव होता. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावला.

गेल्या महिन्यात रावण टोळीचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा वाढदिवस होता. त्यावेळी रावण गँगच्या सदस्यांनी तलवारीने केक कापत परिसरात दहशत निर्माण केली होती. मात्र त्यावेळी पोलिसांना वेळेवर माहिती मिळाली नाही. पोलिसांना माहिती मिळाल्यावर वाढदिवस साजरा करणारेही पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. या टोळीतील काही सदस्य इतर राज्यात पळून गेले आहेत.

अनिकेत जाधव याचा 20 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. त्यांच्या स्मृतिदिनाच्या नावाखाली पुन्हा दहशत निर्माण करण्याचा रावण टोळीचा डाव होता. याबाबत पोलिसांना कुणकूण लागली होती. म्हणून ज्या ठिकाणी त्याचा खून झाला होता तिथे पोलिसांनी गस्त ठेवली. मात्र, रावण टोळीच्या सदस्यांना अनिकेत जाधवचा ज्याठिकाणी खून झाला त्या ठिकाणी येऊ द्यायचे आणि मग त्यांची धरपकड करायची, अशी व्यूहरचना ठरल्याने पोलिसांनी त्या ठिकाणची गस्त बंद केली. मात्र पोलीस सतर्क असल्याचे पाहून या टोळीतील सदस्य घटनास्थळाकडे फिरकलेच नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.