Pimpri : तडीपार आरोपीला पिंपरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून दीड वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आढळून आला. पिंपरी पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या. ही कारवाई मंगळवारी (दि. 16) रात्री सव्वाअकराच्या सुमारास रामनगर पिंपरी येथे केली.

बाळू रोहीदास मोहिते (वय 31, रा.राममंदीराच्या मागे, रामनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुहास बबन डंगारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिसांनी बाळू याला 11 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी तडीपार केले. परंतु पोलिसांच्या आदेशाचा भंग करून बाळू मंगळवारी रामनगर परिसरात असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राम मंदिर परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. त्यानुसार त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.